आयुषमानच्या पत्नीनं त्यांच्या ‘sex life’ चा केला खुलासा; अभिनेता नाराज?Ayushmann Khurrana
Published on : 31 May 2022, 5:39 am
हेही वाचा: प्रसिद्ध टी.व्ही अभिनेत्याच्या पत्नीनं केलं टक्कल; कारण ऐकून व्हाल थक्क
ताहिरा कश्यपने या पुस्तकात खुलासा केलाय की, आपल्या मुलासाठी पम्प केलेलं ब्रेस्ट मिल्क तिच्या नवरा प्यायला होता. तसंच तिनं या पुस्तकाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की,”मुलं झाल्यानंतर ती आयुषमानसोबत हनिमूनला गेली होती,पण तो हनिमून फारसा यशस्वी ठरला नाही”. आयुषमानने पत्नीच्या या चर्चेत असलेल्या पुस्तकासंदर्भात बोलताना म्हटलं आहे की,”मी हे पुस्तक अद्याप वाचलेलं नाही”. तो असं देखील म्हणाला आहे की,”हे पुस्तक काही वाचकांना केवळ मनोरंजन वाटेल,पण हे पुस्तक केवळ मनोरंजन या गटात मोडत नाही”.
हेही वाचा: छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध निवेदिका परिझाद कोलाह अपघातात गंभीर जखमी
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा आयुषमानला विचारलं गेलं की,’ एक वाचक आणि पती म्हणून तुझ्या पत्नीचं हे पुस्तक कसं वाटलं तुला ?’ तेव्हा तो म्हणाला,”वाचक म्हणू नक्कीच हे पुस्तक वाचनीय आहे असं मी म्हणेन. पण खरं सांगायचं तर मला स्वतःच्या पर्सनल गोष्टी लोकांशी शेअर करायला आवडत नाहीत. माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणं आवडत नाही. आणि आम्ही दोघं याबाबतीत खूप वेगळे आहोत. अनेकांसाठी माझ्या पत्नीचं पुस्तक एंटरटेनिंग असेल कदाचित पण मी ते अजून वाचलेलं नाही”. ‘तहिरानं तुमचे बैडरुम सीक्रेट्स सगळ्यांसमोर मांडले तेव्हा तुला कसं वाटलं?’ हे विचारल्यावर आयुषमान म्हणाला,”मला माहित नाही हे. तिच्या मनात जे येतं ते ती बोलून दाखवते,करते, पण मी तसा माणूस नाही”.
हेही वाचा: ‘धर्मवीर’ चा शो पहायला सिनेमागृहात फक्त एकच माणूस? प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत
ताहिरा कश्यप आणि आयुषमान खुरानानं २००८ मध्ये लग्न केलं होतं. दोघांमध्ये शाळेपासून मैत्री आणि प्रेम होतं. आयुषमान आणि ताहिरा आता दोन मुलांचे आई-बाबा आहेत. वरुष्का आणि विराजवीर अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. शिल्पा शेट्टीच्या शो मध्ये काही दिवसांपूर्वी ताहिरा कश्यप पोहोचली होती. तेव्हा तिनं आपल्या सेक्स लाईफविषयी उघडपणे भाष्य केलं होतं. ताहिरानं म्हटलं होतं,”सेक्स वर्कआऊटचाच एक भाग आहे. छोट्याशा वेळात देखील तो आपली कॅलरी बर्न करायला मदत करतो”. असं ताहिरा म्हणाली होती.
Web Title: Ayushmann Khurrana Opens Up About His Wife Tahira Kashyaps Book On Their Sex
https://www.esakal.com/manoranjan/ayushmann-khurrana-opens-up-about-his-wife-tahira-kashyaps-book-on-their-sex-lifeppm81
Leave a Reply